छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे.
याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मुनमुन दत्ताला ओळखले जाते.
मुनमुन दत्ताने या मालिकेत बबीता हे पात्र साकारले आहे. या पात्रामुळे ती घराघरात पोहोचली.
आता मुनमुन दत्ताने एक नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
यात मुनमुनने भरजरी लेहंगा परिधान केला आहे.
त्यासोबतच तिने लेहेंग्यावर साजेशी ज्वेलरी परिधान केली आहे.
विशेष म्हणजे मुनमुनने यावेळी लेहंग्यासोबत पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते.
मुनमुनच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिने अनेक चाहते या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे.