थंडगार ताडगोळे शरीरासाठी हानीकारक ठरु शकतात.
उन्हाळा सुरु झाला की बाजारात मोठ्या प्रमाणात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध होतात.
उन्हाळ्यात ताडगोळे खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. मात्र, याचे सेवन शरीरासाठी त्रासदायक देखील ठरु शकते.
जास्त प्रमाणात ताडगोळे खाल्यास अपचन होऊ शकते. तसेच गॅसची देखील समस्या निर्माण होऊ शकते.
जास्त प्रमाणात ताडगोळे खाल्यास पोटदुखी होऊन, उलटी आणि मळमळ असा त्रास देखील होऊ शकतो.
जास्त प्रमाणात ताडगोळे खाण्यामुळे वजन वाढू शकते.
गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ताडगोळे खाऊ नयेत.