जेठालालवर रागाच्या भरात खुर्ची फेकली, तारक मेहताच्या सेटवर भांडण; अभिनेत्रीचा खुलासा

असित मोदीवर गंभीर आरोप

बावरी म्हणजेच मोनिका भदौरियाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचा निर्माता असित मोदीवर अनेक गंभीर आरोप केले असून, काही खुलासे केले आहेत.

जेठालालवर रागाच्या भरात खुर्ची फेकली

मालिकेतील मुख्य अभिनेता जेठालाल उर्फ दिलीप दोशी यांच्याशी गैरव्यवहार करण्यात आला. त्यांच्या अंगावर खुर्ची फेकण्यात आली असं मोनिकाने सांगितलं आहे.

सोहेल रमानीकडून अपमान

मोनिकाने सांगितलं की, मी त्यादिवशी सेटवर नव्हती. पण मला माहिती मिळाली की, ऑपरेशनल हेड सोहेल रमानीने एका वरिष्ठ अभिनेत्याचा अपमान केला.

दिलीप दोशी यांना अपमानास्पद वागणूक

"तो अभिनेता दुसरं कोणी नाही तर दिलीप दोशी होते. यामुळे सोहेल रमानीवर दोन वर्षांसाठी बंदीदेखील घालण्यात आली होती".

सेटवर भांडण

"सोहेलला नेहमीच आपण कोणाचाही अपमान करु शकतो, कसंही वागू शकतो असं वाटतं. भांडण झालं असता त्याने खुर्ची फेकून मारली होती".

सेटवर गुंडगिरी

"जेठालाल यांच्या नावावरच तर मालिका चालते. पण सोहेल नेहमीच वाईट वागणूक देत असतो. त्याची गुंडगिरी इथपर्यंत पोहोचली आहे की, काम करणं कठीण आहे".

"माझ्याकडे सर्व पुरावे"

"जर मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवली तर तुम्हीच म्हणाल की, हा महिलांशी किती वाईट पद्धतीने बोलतो. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत".

असित मोदी यांचा पाठिंबा

"सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, सोहेलने इतक्या वाईट पद्धतीने वागत असतानाही असितने त्याला कधी मालिकेतून काढलं नाही. तो आजही त्यांच्यासह काम करतो".

"असितला फार अहंकार"

"पण त्या घटनेनंतर दिलीप जोशी कधीच सोहेलशी बोलले नाहीत. असितला फार गर्व आहे. तो बाहेरुन सर्वांशी गोड वागतो, पण आतून त्याच्यात फार अहंकार आहे".

मोनिकाने आरोप करत सोडली होती मालिका

मोनिकाने मालिकेत बाघाची प्रेयसी बावरीची भूमिका निभावली होती. अभिनेत्रीने पाच वर्षं काम केल्यानंतर असित मोदीवर अनेक आरोप लगावत मालिका सोडली होती.

VIEW ALL

Read Next Story