स्री-2 चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्येच 100 कोटींहून अधिकचा गल्ला कमवला आहे. दुसऱ्या दिवशाची कमाई चित्रपटाच्या बजेटपेक्षाही अधिक होती.
स्री-2 चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीच 200 कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे.
अवघ्या 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या स्री-2 चित्रपटाने पहिल्या चार दिवसात 267 कोटींची कमाई केली आहे.
कोणताही मोठा कलाकार नसताना मागील काही वर्षांमध्ये सर्वात यशस्वी कामगिरी करणारा चित्रपट म्हणून स्री-2 चं नाव आता अग्रक्रमाने घेतलं जात आहे.
मात्र या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकांबरोबरच सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी किती मानधन घेतलंय माहितीये का? चला पाहूयात या चित्रपटासाठी कोणाला किती पैसे मिळालेत...
प्रमुख सहाय्यक अभिनेता असलेल्या पंकज त्रिपाठी यांनी स्री-2 मधील भूमिकेसाठी राजकुमारच्या अर्ध म्हणजेच 3 कोटी मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.
विकी म्हणजेच राजकुमारच्या मित्राची भूमिका साकारण्यासाठी अपारशक्ती खुरानाने 70 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याने बिट्टू हे पात्र साकारलं आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्रीच्या सिक्वेलसाठी तब्बल 5 कोटींचं मानधन घेतल्याची चर्चा आहे.
राजकुमार रावने स्री-2 मधील विक्की या मुख्य भूमिकेसाठी 6 कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं जातं.
अभिषेक बॅनर्जीने स्री-2 मध्ये विकीच्या मित्राची भूमिका साकारण्यासाठी 55 लाखांचं मानधन घेतलं आहे.
विशेष म्हणजे पाहुणा कलाकार म्हणून अभिनेता वरुण धवनने स्री-2 मधील भूमिकेसाठी तब्बल 2 कोटींचं मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.