दाक्षिणात्य अभिनेते

दाक्षिणात्य अभिनेत्यांनी फक्त रुपेरी पडदा गाजवण्याचंच काम केलं नसून त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही उडी घेतली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री

फक्त अभिनेतेच नव्हे, तर अभिनेत्रींनीसुद्धा या क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रांमध्ये त्यांचं नशीब आजमावलं आहे.

थालापती विजय

अभिनेता थालापती विजय हा तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीचा सेलिब्रिटी असून, चेन्नईत त्याचा Wedding Halls चा व्यवसायही आहे. हा व्यवसाय त्याची आई, मुलगा आणि पत्नीच्या नावावर आहे.

तमन्ना भाटिया

अभिनेत्री तमन्ना भाटियानं 2015 मध्ये स्वत:चं ऑनलाईन ज्वेलरी शॉप सुरु केलं. विटेनगोल्ड.कॉम या नावानं तिची वेबसाईट काम करते.

नागार्जुन

अभिनेता नागार्जुनचे हैदराबादमध्ये अनेक रेस्तराँ आहेत. एन-3 एंटरप्राईजची मालकीची त्याच्याचकडे आहे.

काजल अग्रवाल

अभिनेत्री काजल अग्रवाल किचलू बेबी अँड मॅटरनल न्यूट्रिशनल ब्रँड Care and cares ची मालकिण आहे.

विजय देवरकोंडा

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा एडीवी थिएटर, ओटीटी प्लॅटफॉर्म एएचए आणि किंग ऑफ द हिल या निर्मिती संस्थेचा मालक आहे.

राम चरण

अभिनेता राम चरण हा हैदराबादस्थित विमान कंपनी 'ट्रूजेट'चा मालक आहे. आश्चर्य वाटलं ना?

राणा डग्गुबती

निर्मिती संस्थेशी संलग्न असणारा अभिनेता राणा डग्गुबती CAA KWAN नावाच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे.

महेशबाबू

अभिनेता महेशबाबू हा चित्रपट निर्मिती संस्थेचा मालक असून, त्याच्या अनेक चित्रपटांची निर्मितीही याच बॅनरअंतर्गत केली जाते.

VIEW ALL

Read Next Story