श्रद्धा कपूरच्या फॅनची कमेंट

अभिनेत्री श्रद्धा कपूरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. तिच्या अभिनयाचेही सर्वच जणं फॅन्स आहेत.

रिलेशनशिप्स आणि ब़ॉलिवूड

त्यातून तिच्या रिलेशनशिप्सचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या लग्नाची.

कलाकारांची चर्चा

प्रत्येकालाच आपल्या आवडत्या कलाकाराच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घ्यायला फारच आवडते.

फॅनची उत्सुकता

एक फॅन म्हणून आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेत असतो.

श्रद्धा कपूरचा रिप्लाय

परंतु तुम्हाला माहितीये का की सध्या आपल्या लग्नावर विचारलेल्या प्रश्नावरून श्रद्धा कपूरनं फार मस्त रिप्लाय दिला आहे.

सेलिब्रेटीची पर्सनल लाईफ

खरंतर आपल्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ केलेली ही कोणालाच आवडत नाही. परंतु सेलिब्रेटी जेव्हा स्वत:हून आपल्या पर्सनल लाईफविषयी बोलतात तेव्हा ती हेडलाईन झाल्याशिवाय राहत नाही.

श्रद्धाचीच चर्चा

सध्या सोशल मीडियावर श्रद्धाचीच चर्चा आहे.

श्रद्धाला लग्नाबद्दल विचारलं...

श्रद्धा ही इन्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. यावेळी तिनं आपल्या अकांऊटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्याखाली एका युझरनं कमेंट केली आहे की, 'तु लग्न कधी करणार'

श्रद्धाची नाराजी

यावर श्रद्धा मात्र फारच चिडलेली दिसली. ती लिहिलं आहे की, 'अरे बाजूच्या आंटी आधी खऱ्या सोशल मीडिया अकांऊटवरून या.'

VIEW ALL

Read Next Story