आमिर खानची लाडकी लेक नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा आयरा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत आली आहे.

यावेळी आयराच्या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर अनेकांनी तिचं चप्पल पाहूनही टोमणे मारले आहेत.

Ira Khan चा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, काय बकवास ड्रेसिंग करते. तर अजून एकाने म्हटलंय, हे तेच कोल्हापूरी चप्पल आहे जे तिने रजिस्टर्ड लग्नाला घातली होती. तर अनेकांनी तिला तिच्या जाडीवरुन ट्रोल केलं.

आयरा आणि तिचा पती नुपूर शिखरेने सोशल मीडियावर हनिमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आमिर सध्या अभिनयापासून दूर आहे, पण त्याच्या प्रोडक्शन कंपनीचा नवा चित्रपट 'लापता लेडीज' या वर्षी मार्चमध्ये रिलीज होणार आहे.

त्याचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट आमिरची एक्स पत्नी किरण राव हिने दिग्दर्शित केला आहे.

VIEW ALL

Read Next Story