'शंभू' हे गाणं अक्षय कुमारसह गायक सुधीर यदुवंशी आणि विक्रम मॉन्ट्रोज यांनी गायलं आहे. अक्षयने पहिल्यांदाच गाण्याला आवाज दिला आहे.

या गाण्याचे बोल अभिनव शेखर यांनी लिहिले असून गणेश आचार्य यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. अक्षय कुमारने हे गाणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. अक्षय कुमार स्वतःला शिवभक्त म्हणवतो.

2023 मध्ये आलेल्या 'OMG 2' चित्रपटात भगवान शिवाची भूमिका साकारणारा अक्षय म्हणाला, 'शंभू माझ्या हृदयातील खोल जागेतून येतो, जो फक्त जय श्री महाकालच्या नावाने धडधडतो.

अभिनेता पुढे म्हणाला मी बराच काळापासून शिवभक्त आहे पण अलीकडे माझा त्यांच्याशी असलेला संबंध आणि भक्ती आणखीनच घट्ट झाली आहे.

अभिनेता पुढे म्हणाला, भगवान शिव शक्ती, प्रेम आणि गरज असेल तेव्हा मदत देखील करतात.

पुढे अभिनेता म्हणाला, यासोबतच तो रक्षणकर्ता आहे, तोच शरणागती आहे, ज्याला आपण सर्वांनी शरण जायचे आहे, तोच सर्वांचा अंत आहे. या गाण्याने मी फक्त शिव म्हणजे अनंत चैतन्याला एक थेंब अर्पण करतो! जय श्री महाकाल.''

अक्षय कुमारच्या शंभू या म्युझिक व्हिडीओला प्रेक्षकांनी अवघ्या काही वेळातच डोक्यावर घेतलं आहे.

VIEW ALL

Read Next Story