सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...?

करिनाच्या उत्तरावर शहिद कपूर स्पष्टच म्हणाला!

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. करण जोहरने करीनाला सोनाक्षी सिन्हाच्या पर्यायी कारकिर्दीबद्दल तिचं मत विचारलं.

सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर ती आज गृहिणी असली असती, असं करिना कपूरने म्हटलं होतं. त्यावेळी तिच्यासह रणबीर कपूर देखील होता. त्याने देखील होकारार्थी मान हलवली होती.

करिना कपूरच्या या वक्तव्यावर आता शाहिद कपूरने चोख प्रत्युत्तर दिलंय. सोनाक्षी केवळ गृहिणी होण्यापेक्षा बरेच काही करू शकते, असं शाहिद कपूर म्हणाला आहे.

शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांनी कॉफी विथ करणमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलंय. करिनाच्या उत्तराने सोनाक्षी सिन्हा नाराज झाल्याचं देखील दिसून आलंय होतं.

दरम्यान, सोनाक्षीनं बॉलिवूडमधील अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. सध्या सोनाक्षी सिनेमात फारशी दिसत नसली तरी तिचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे.

VIEW ALL

Read Next Story