बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 24 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता विवाहबंधनात अडकणार आहेत.

परिणीतीच्या लग्नात तिची खास मैत्रीण सानिया मिर्झा हजेरी लावणार आहे. तसंच दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खानही सहभागी होणार आहे.

तिघीही फार जिवलग मैत्रीण असून सणांपासून ते सेलिब्रेशनपर्यंत सगळीकडे एकत्र असतात.

दरम्यान, सानियाने परिणीतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

आपण आपल्या मैत्रिणीला लवकरच मिठी देणार असल्याचं सानियाने फोटो पोस्ट करताना म्हटलं आहे. यासह तिने शुभेच्छाही दिल्या आहेत.

सानिया मिर्झाने शेअर केलेला फोटो तसा फार जुना आहे. पण दोघींमधील मैत्री मात्र आजही तितकीच ताजी आहे.

सानियाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की; सुंदर मुली, शुभेच्छा. तुला मिठी देण्याची आता माझी वेळ आहे, तयार राहा.

सानिया मिर्झा भारताची माजी टेनिसपटू आहे. तिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केलं आहे. हे लग्नही फार चर्चेत होतं.

VIEW ALL

Read Next Story