कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सोमवारी सैफला दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला ट्रायसेप्समध्ये समस्या येत होती.

ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आज त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे.

अभिनेत्यावर ट्रायसेप्सची शस्त्रक्रिया झाली आहे. झूमला मुलाखत देताना त्यांनी सांगितले की, तो बऱ्याच दिवसांपासून या समस्येचा सामना करत होता.

शूटिंगदरम्यानच त्याच्या वेदना खूप वाढल्या होत्या. कधी वेदना कमी, कधी खूप जास्त असायच्या म्हणूनच अभिनेत्याने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर सैफ करिनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इंडिया टुडेशी बोलताना सैफ अली खानने चाहत्यांचे आभार मानले.

काही दिवस आराम करुन फ कामाला सुरुवात करेल. या वर्षी त्याचे दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

VIEW ALL

Read Next Story