सकाळी तुम्हीपण चहा-पराठा खाता का? पण तो हेल्दी कसा बनवता येईल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सकाळी न्याहारी म्हणून तुम्ही पराठा खात असाल तर पालक किंवा मेथीचा या पालेभाज्यांचा त्याच वापर करा
पराठ्यांमध्ये बटाट्याऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थ वापरा. जसे की, पालेभाज्या, पनीर, अंड असे पदार्थ वापरा
पराठे करताना पीठाच्या गोळ्यात भाजीचे स्टफिंग करताना भाजीचे प्रमाण वाढवा. यामुळं पराठा पौष्टिक होतो
नॉनस्टीक पॅनऐवजी लोखंडाचा तवा वापरा. या मुळं शरीरातील लोहाची कमतरता भरुन निघते
पराठ्यांना तेल लावण्याऐवजी तुपाचा वापर करा. यामुळं हृदय निरोगी राहिल.
न्याहारी केल्यानंतर जवळपास एक तासानंतर चहा प्या. यामुळं अॅसिडीटी होण्याचे प्रमाण कमी होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)