मालिका विश्वातील 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचंही ठरलं, बर्थ-डेलाच दिलं सरप्राइज

सहकुटुंब सहपरिवार ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र त्यापूर्वीच या मालिकेतील अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

मालिकेतील अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभारचा आज वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच तिने एक खास सरप्राइज चाहत्यांना दिलं आहे.

कोमलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दिसत आहेत. त्याचबरोबर आणखी एक व्यक्तीही तिच्यासोबत दिसत आहे.

या इन्स्टाग्राम व्हिडिओत कोमलसोबत तिचा भावी जोडीदारही दिसत आहे. त्याचे नाव गोकुळ दशवंत असं आहे.

या व्हिडिओत गोकुळ गुडघ्यावर बसून कोमलला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. गोकुळने तिच्यासाठी खास अंगठीही बनवली आहे.

कोमल व्हिडिओत खूप आनंदी दिसत आहे. तसंच, ती केक कापत असताना तिच्या शेजारी हॅपी बर्थडेचा बोर्ड ठेवला असून त्यावर बायको असा उल्लेख आहे.

केकशेजारचा बोर्ड पाहून कोमल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, त्यावर तिने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाहीये

गोकुळ हादेखील मनोरंजनसृष्टीतच काम करतो. तो अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे.

VIEW ALL

Read Next Story