सुशांतच्या निधनानंतर झालेल्या ट्रोलिंगवर Rhea Chakraborty म्हणाली, "त्यांनी मला जी नावं दिली..."

सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती झाले होते आरोप

सुशांत सिंग राजपुतचे जून 2020 साली निधन झाले. त्याच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीवर आरोप करण्यात आले होते.

फक्त सुशांतच्या कुटुंबाकडून नाही तर इतरांनी केले हे आरोप

रियावर फक्त फक्त सुशांतच्या कुटुंबाकडून नाही तर त्याच्या जवळच्या व्यक्तींकडूनही आरोप करण्यात आले होते.

सुशांतच्या मृत्यूनंतर बदलले रियाचे आयुष

सुशांतच्या निधनानंतर तिचे आयुष्य कसे बदलले याविषयी रियानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं कधीही हार मानायची नाही असं म्हटलं आहे.

लोकांनी केली होती टीका

रियानं कोणाचंही नाव न घेता तिच्यावर कशा प्रकारे लोकांनी टीका केली याविषयी सांगितले आहे.

आव्हानांना द्या तोंड

रिया या व्हिडीओत म्हणाली आहे की कधीही कोणत्याही आव्हानां समोर हार मानू नका आणि त्याला तोंड द्या असं म्हटलं आहे.

कोण काय बोलतं त्याकडे लक्ष दयायचं नाही...

रिया यावेळी म्हणाली की तिच्याविषयी अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तिला अनेकांनी वेगवेगळी नावं दिली पण तिनं लक्ष दिलं नाही. लोक काय विचार करतात त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण ते काय बोलतात हे जास्त महत्त्वाचं नाही तर आपल्याला आपल्यावर विश्वास असायला हवा.

आपल्या आत्म्याचा आवाज ऐकायचा

रिया या व्हिडीओत म्हणाली, लोक काय म्हणतात याचा परिणाम होऊ द्यायचा नाही स्वत: च्या आत्म्याचा आवाज ऐकायचा.

MTV Roadies मधून कमबॅक

अंमली पदार्थांच्या आरोपांचा सामना केल्यानंतर आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता रियानं MTV Roadies मधून कमबॅक केला आहे.

तीन वर्षानंतर रिया दिसली पडद्यावर

2020 साली सुशांतच्या निधनानंतर रियावर त्याला अंमली पदार्थ पुरवल्याचे आरोप करण्यात आले होते. सुशांतच्या घरच्यांनी तिच्यामुळे त्याचे निधन झाल्याचे म्हटले. त्यानंतर जवळपास दोन वर्षे ब्रेक घेतल्यानंतर रोडीजमधून कमबॅक केलं आहे. (All Photo Credit : Rhea Chakraborty Instagram)

VIEW ALL

Read Next Story