सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहऱ्यांची एकूण संपत्ती पाहून तुम्हाला नक्कीच बसेल धक्का
'मोस्टली सेन' नावाने नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली प्राजक्ता कोळी ही मुंबईमधील मुलुंड येथील वझे-केळकर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. प्राजक्ता ठाण्यात वास्तव्यास आहे.
मजेदार कंटेट तयार करणाऱ्याने प्राजक्ताने सोशल मीडियावरुन वेबसिरीजपर्यंत आणि पुढे चित्रपटांपर्यंत मजल मारली आहे. तिचा समावेश फोर्ब्सच्या 30 अंडर 30 च्या 2019 च्या यादीतही झाला आहे.
'पिंकव्हिला'ने दिलेल्या वृत्तानुसार प्राजक्ता कोळीची संपत्ती 16 कोटी असल्याचे समजते.
लोकप्रिय युट्यूबर्सपैकी एक असलेलं नाव म्हणजे रणवीर इलाहबादीया. 'बीअरबायसेप्स' नावाने लोकप्रिय असलेला रणवीर हा 'माँक इन्टर्नेनमेंट'चाही संस्थापक आहे.
रणवीर हा लाइफस्टाइल कोच, मोटीव्हेशनल स्पीकर आहे. त्याचा 'द रणवीर शो' हा मुलाखतींचा पॉडकास्ट प्रचंड लोकप्रिय आहे.
रणवीर इलाहबादीयाची एकूण संपत्ती 58 कोटी रुपये इतकी आहे.
कुशा कपिला ही मागील काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मात्र कुशा ही भारतामधील सर्वात प्रभावी सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर्सपैकी एक आहे.
साऊथ दिल्ली आंटीच्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झालेली कुशा ही आधी कंटेट रायटर होती. बिल्ली मासीचं कॅरेक्टर लोकप्रिय झाल्यानंतर कुशाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. तिने अगदी नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्येही काम केलं आहे.
कुशाची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये असल्याचं 'झी'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
कॅरिमिनाटी नावाने लोकप्रिय असलेल्या अजय नागरही कमी वयात सोशल मीडिया स्टार झालेला युट्यूबर आहे.
कॉमेडी स्कीट, रोस्ट व्हिडीओबरोबरच तो कॅरीइजलाइव्ह चॅनेलच्या माध्यमातून अजय घडामोडींसंदर्भात आपली मतं मांडतो.
अजय नागरची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये इतकी आहे.
युट्यूबबरोबरबरच अजय जाहिराती, स्पॉन्सरशीप आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून कमाई करतो.
मौसम मिनावाला ही लक्झरी फॅशन आणि लाइफस्टाइल ब्लॉगर आहे.
मौसमची एकूण संपत्ती 12 कोटी रुपये इतकी आहे.
भूवन बाम हा 'बीबी की वाइन्स' नावाने सोशलम मीडियावर प्रसिद्ध आहे. तो अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
भूवनने एक गायक म्हणून महिना 5 हजार रुपयांवर आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
मात्र सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्यानंतर भूवन बामला प्रसिद्धीबरोबरच संपत्तीही मिळाली.
भूवन बामची एकूण संपत्ती सध्या 122 कोटी रुपये इतकी आहे. यासंदर्भातील वृत्त डीएनएने दिलेलं.