आपल्या प्रेमीला किंवा क्रशला पाहिल्यावर आपल्या पोटात गुदगुल्या का होतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर चला जाणून घेऊया कारण...
ऑक्सिटोसिन हे केमिकल प्रेमाच्या भावनांसाठी संबंधीत आहे. मग ते फक्त रिलेशनशिपमध्येच नाही तर आईचे तिच्या मुलासाठीचे प्रेम देखील असते.
मेंदूतील हायपोथालेमस या भागातून ऑक्सिटोसिन सोडले जाते आणि अनेकदा भावनिक किंवा जिव्हाळ्याच्या अनुभवांमुळे ते जागरुक होतात. जेव्हा ऑक्सिटोसिन सोडले जाते तेव्हा त्याचे शरीरावर विविध परिणाम होतात.
आपल्या जवळच्या व्यक्तीला पाहून पोटात मुंग्या येणे किंवा फुलपाखरे येऊ शकतात. बऱ्याचवेळा झोप येत नाही आणि अनेकांना तर भूक लागत नाही. हे बदल ऑक्सिटोसिनमुळे होतात.
जेव्हा आपण अशा व्यक्तीला पाहतो ज्यावर आपण प्रेम करतो किंवा त्याच्यावर आपल्याला क्रश आहे. तेव्हा त्याला पाहून आपले हार्ट बीट फास्ट होतात. याचे कारण असे आहे की शरीर Catecholamines नावाचे केमिकल सोडते.
कॅटेकोलामाइन्स आपल्या नसांना सिग्नल पाठवते आणि त्यामुळेच आपली हार्च बीट फास्ट होते.
ऑक्सिटोसिनच्या उत्सर्जनामुळे आपल्याला हे सगळं फील होतं. हा हार्मोन मेंदूमधून निघतो आणि त्यानंतर शरीरात विविध शारीरिक बदल घडवून होतात.
ऑक्सिटोसिनच्या उत्सर्जनामुळे पोटात गुदगुल्या होतात. झोप येत नाही आणि भूकही लागत नाही.
(All Photo Credit : Freepik)