वयाच्या 43 व्या वर्षी प्रभास चढणार बोहल्यावर, अखेर कुटुंबीयांनीच सांगितलं...

प्रभास

प्रभास एकीकडे त्याचा आगामी चित्रपट सालारची प्रतिक्षा करत असताना दुसरीकडे त्याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

काकूनं केलं वक्तव्य

प्रभासनं अजून त्याच्या लग्नाविषयी काही सांगितलेलं नसलं तरी त्याच्या काकूनं मात्र, त्यावर प्रतिक्रिया वक्तव्य केलं आहे.

प्रभासचं लग्न नक्कीच होणार

'बॉलिवूड लाइफ'नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, प्रभासची काकू श्यामला देवीनं त्याच्या लग्नाच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या की प्रभासचं नक्कीच लग्न होणार आणि दुर्गा माता त्याला आशीर्वाद देईल.

लग्न चर्चेचा विषय असल्यानं घेतला मोठा निर्णय

प्रभासच्या काकूनं सांगितलं की 'त्याचं लग्न ठरताच लगेत मीडियाला याविषयी माहिती देण्यात येईल कारण त्याचं लग्न हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतं.'

कधी होणार सालार प्रदर्शित

प्रभासचा सालार हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखसोबत होणार क्लॅश

शाहरुखच्या 'डंकी' या चित्रपटासोबत प्रभासच्या 'सालार' बॉक्स ऑफिसवर होणार क्लॅश. एकाच दिवशी प्रदर्शित होणार दोन्ही चित्रपट.

प्रभाससोबत दिसणार 'हे' कलाकार

प्रभाससोबत या चित्रपटात श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर प्रशांक नील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story