बॉलिवूडमध्ये आता बोल्ड सीन्स आणि प्रणय दृश्ये ही अगदी सहज दाखवली जातात.
त्यातून ओटीटीवर हा तद्दन मसाला आणि क्राईमपट वाढल्यामुळे असे चित्रपट आणि वेबसिरिजची चर्चा असते.
सध्या यातील एका दृश्यावर एका लोकप्रिय अभिनेत्रीचे वक्तव्य गाजते आहे.
'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फकरी ही पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करते आहे.
तेव्हा नुकत्याच हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या मुलखातीतून तिनं एक वक्तव्य केले आहे.
यावेळी ती म्हणाली की, ''माझा नग्नतेला विरोध आहे मी कधीच कुठल्याही प्रोजेक्टसाठी नग्न होणार नाही.''
समलैंगी भुमिका निभावणं हा माझ्या कामाचाच भाग असेल. परंतु नग्नता मी नाही स्विकारू शकत.
यावेळी तिचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. (All Photos: Zee News)