स्विमिंग पूल, लॉन टेनिस! देशातील महागडी शाळा... सलमान इथेच शिकला

ग्वालिअरमधलं सिंधिया स्कूल देशातील महागड्या शाळांपैकी एक आहे. या शाळेत श्रीमंत किंवा सेलिब्रेटींची मुलं शिकतात

या शाळेची फी ऐकून हैराण व्हाल. या शाळेत विद्यार्थ्यांना अनेक हाय-फाय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

या शाळेत विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास शिकवला जात नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासावरही भर दिला जातो.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानही ग्वालियरमधल्या या द सिंधिया स्कूलमध्ये शिकला आहे.

द सिंधिया स्कूल ग्वालियर किल्ल्यावर आहे. ही शाळा शंभर एकराहून अधिक जागेत पसरली आहे. यावरुन शाळेच्या भव्यतेचा अंदाज येतो.

या शाळेचं संचालकपद ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे आहे. शाळेत अनेक ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आकर्षित करतात

द सिंधिया स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तब्बल 22 मैदानं आहेत. यात क्रिकेट लॉन टेनिस, हॉर्स रायडिंग, बॉक्सिंग या सारखे खेळ शिकले जातात. शिवाय एक स्विमिंग पूलही आहे.

द सिंधिया स्कूलच्या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार शाळेची वर्षाची फी 13 लाख 25000 इतकी आहे. याशिवाय इतर अॅक्टिव्हिटीचेही पैसे घेतले जातात.

VIEW ALL

Read Next Story