'आई कुठे काय करते' मालिकेत अंकिताची भूमीका साकारणाऱ्या राधा सागरचे संपूर्ण नाव हे राघा सागर कुलकर्णी असं आहे. (Photo Credit : Radha Sagar Instagram)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये असणारा अभिनेता पृथ्वीक प्रतापचं पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे असे आहे. (Photo Credit : Prithvik Pratap Instagram)
'माझ्या नव-याची बायको' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली रसिका सुनील तिच्या वडिलांच नाव लावते. तर तिचं खरं नाव हे रसिका सुनील धाबडगावकर असे आहे. (Photo Credit : Rasika Sunil Instagram)
छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय आणि अनेक मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या पार्थ समथानचं खरं नाव पार्थ लघाटे असे आहे. तर हा मराठमोळा मुलगा लघाटे न लावता समथान असं लावतो. (Photo Credit : Parth Samthan Instagram)
‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव ही तिच्या नावापुढे फक्त वडिलांचे नाव लावते. सायली संजीव चांदसारकर असे तिचं पूर्ण नाव आहे. (Photo Credit : Sayali Sanjeev Instagram)
मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय ललित प्रभाकरचे पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे. भदाणे हे आडनाव न लावता ललित देखील त्याच्या वडिलांचे नाव प्रभाकर लावतो. (Photo Credit : lalit prabhakar Instagram)
सगळ्यांची लाडकी आणि नागीण, बिग बॉस सारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असं आहे. पण तेजस्वी तिच्या नावापुढे फक्त वडिलांचं नाव लावते. (Photo Credit : Tejasswi Prakash Instagram)