मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरे ओळखली जाते. प्रार्थनाने 2009 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

प्रार्थना ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती चाहत्यांच्या तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल अपडेट देताना दिसते.

आता सध्या प्रार्थना ही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

प्रार्थनाने तिच्या गर्ल्स गँगसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

यातील काही फोटोत तिने बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.

तर दुसऱ्या फोटोत तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.

यात प्रार्थना फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोंवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत.

VIEW ALL

Read Next Story