‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते.
सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. सावनी असे तिच्या पात्राचे नाव आहे.
अपूर्वाने या मालिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.
आता अपूर्वाने तिचे जीममधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
यावेळी अपूर्वाने गुलाबी रंगाचे टीशर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.
यात ती कमालीची फिट दिसत आहे.
सध्या अपूर्वाच्या या फिटनेस लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
यावर एकाने 'शेवंता बारीक झाली रे', असे म्हटले आहे. तर एकाने 'काय खतरनाक बदल झालाय', अशी कमेंट केली आहे.