‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील 'राधिका'चा ग्लॅमरस अंदाज

अनिता दाते

झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते प्रमुख भूमिकेत झळकली.

राधिका

अनिता दातेने या मालिकेत राधिका हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळेच ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली.

फोटोशूट

अनिता दाते ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आता तिच्या एका फोटोशूटची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

अनिता दातेने यावेळी काळ्या रंगाची आणि रंगेबेरंगी प्रिंट असलेली साडी नेसली होती.

"पूर्ण कपडे घातलेले असतानादेखील तुमच्या चेहऱ्यावर हास्याशिवाय तुम्ही अपूर्ण आहात", असे कॅप्शन अनिताने या फोटोला दिले आहे.

सध्या अनिता ही 'इंद्रायणी' या मालिकेमुळे चर्चेत आहे.

तसेच 'माझ्या बायकोचा नवरा' या नाटकातही ती सध्या व्यस्त आहे.

यासोबतच अनिताने 'मी वसंतराव', 'अय्या', 'तुंबाड', 'कॉफी आणि बरंच काही' अशा अनेक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story