मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाच्या फिटनेस आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

एक उत्तम डान्सर म्हणून ती कायमच चर्चेत असते.

फिटनेसबाबत विशेष जागरूक असलेल्या मलायकाचा फॅशन सेन्स कमाल आहे.

आता मलायकाने देसी लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा साधा कुर्ता आणि लेहंगा परिधान केला होता. त्यासोबत तिने कोल्हापुरी चप्पलही घातली होती.

या फोटोला कॅप्शन देताना तिने 'नो फिल्टर लूक' असे म्हटले आहे.

मलायकाच्या या साध्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ती तिच्या फिटनेसवर नेहमी लक्ष केंद्रीत करते.

VIEW ALL

Read Next Story