आजकाल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या एंगेजमेंटच्या बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हे दोन्ही स्टार्स लवकरच एंगेजमेंट करणार आहेत. अधिकृतपणे दोघांनीही यावर अद्याप काहीही सांगितलेलं नाही. त्याचवेळी एंगेजमेंटसोबतच हे कपल लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.
मलायका हा ड्रेस परिधान करून वांद्र्यात स्पॉट झाली होती. अभिनेत्रीने पापाराझींना पाहताच तिने एकापेक्षा एक पोझ देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, अभिनेत्रीचा हा किलर लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या रिविलींग ड्रेससह, मलायका तपकिरी रंगाची हँडबॅग आणि पीच रंगाची हाय हील्स परिधान करताना दिसली. मलायका अरोरा हा रिव्हिलिंग ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर येताच तिने तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावलं. एवढंच नाही तर मलायकाच्या पिवळ्या रंगाच्या गॉगल्सनेही तिच्या लुकमध्ये ग्लॅमर वाढवलं.
धोती स्कर्टसह रिव्हलिंग क्रॉप टॉप परिधान करून मलायकाने अशा पोज दिल्या की, चाहते तिच्या लूकवर फिदा झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मलायका अरोराच्या लेटेस्ट लूकचे फोटो पाहा. या फोटोंमध्ये मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या धोती स्कर्टसह रिव्हलिंग क्रॉप परिधान करताना दिसली. अभिनेत्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ज्यामुळे ती अधिक बोल्ड दिसत आहे.
मलायका अरोरा स्टाईल आणि लूकच्या बाबतीत नेहमीच बड्या-बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. मलायका बर्याचदा अशा कपड्यांमध्ये कॅमेऱ्यात दिसली आहे की, तिचा लूक पाहून चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं आहे. यावेळीही मलायका पांढऱ्या रंगाचा प्रीटेंड ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली.