मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल १९ जून रोजी ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या कारकिर्दीत तिला एकदा विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.

काजलच्या सहकलाकाराने तिला जबरदस्तीने किस केले होते. ही कथा 'दो लफ्जों की कहानी' या हिंदी चित्रपटाची आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत होता.

या चित्रपटात काजलला किसिंग सीन करायचा नव्हता आणि तिला याबद्दल सांगितलेही नव्हते. त्यानंतर काजलला चित्रपटात रणदीप हुड्डासोबत एक इमोशनल सीन शूट करायचा होता.

सिनेमात ते प्रेमीयुगुल असल्याने रणदीपने तिला मिठी मारली आणि नंतर अचानक काजलच्या परवानगीशिवाय, त्याने तिचे चुंबन घेतले. चुंबन घेतल्यानंतर काजलला राग आला.

काजल अग्रवाल शूट सोडून तिथून निघून गेली. मग तिने सीन कट करून डिलीट करायला सांगितला. पण दिग्दर्शक दीपक तिजोरी यांनी तिला समजावले.

रणदीपला या घटनेबद्दल रणदीपला माहितीही नव्हती. त्यावेळी काजल अग्रवालचे टॉपलेस फोटोशूटही व्हायरल झाले होते. तिचे टॉपलेस फोटोशूट एका मॅगझिनवर प्रसिद्ध झाले होते.

याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आपण असे कोणतेही फोटोशूट केले नसल्याचे तिने सांगितले होते. आपल्या फोटोशी छेडछाड केल्याचे तिने सांगितले होते.

VIEW ALL

Read Next Story