बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनने नुकताच मुंबई मेट्रोने प्रवास केला.

ह्रतिकने इंस्टाग्रामला प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

दरम्यान ह्रतिक चक्क मेट्रोत दिसल्यानंतर प्रवाशांचा विश्वासच बसत नव्हता.

प्रवाशांना यावेळी ह्रतिकसह फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

ह्रतिकने हे फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, आज मेट्रोने कामावर पोहोचलो. यावेळी काही गोड आणि चांगल्या लोकांची भेट झाली.

हा फार चांगला अनुभव होता. ऊन आणि वाहतूक कोंडीवर मात केली. अॅक्शन शूटला जात असल्याने पाठही जपली असंही त्याने लिहिलं आहे.

दरम्यान काही वेळातच ह्रतिकची पोस्ट आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

काही युजर्सनी आपण या मेट्रोत का नव्हतो अशी कमेंट करत खंत व्यक्त केली.

VIEW ALL

Read Next Story