आज दिग्दर्शक राकेश रोशन यांचा वाढदिवस असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
राकेश रोशन हे सध्या त्यांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अभिनेता म्हणून ही एक काळ गाजवला.
राकेश रोशन यांनी अभिनय केलेल्या अनेक चित्रपटांनी तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली आहे.
राकेश यांना 'खुदगर्ज' चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा ओळख मिळाली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
राकेश यांनी 'कहो ना प्यार है' चित्रपटातून आपल्या मुलाला म्हणजेच ऋतिकलाही लॉन्च केलं. हा चित्रपटही हीट ठरला.
मात्र राकेश रोशन यांचे अनेक चित्रपट हे K अक्षराने सुरु होतात हे तुम्हाला कधी लक्षात आलं आहे का? या मागे एक खास कारण आहे.
सन 1982 राकेश रोशन यांनी 'कामचोर' चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट हीट ठरला. त्यानंतर त्यांनी 1984 मध्ये 'जाग उठा इंसान' चित्रपट दिग्दर्शित केला पण हा चित्रपट पडला.
त्यानंतर 1986 मध्ये राकेश रोशन यांचा 'भगवान दादा' चित्रपटही पडला. यानंतर एका चाहत्याने त्यांना तुमच्या चित्रपटांची नाव K वरुनच ठेवा असा सल्ला दिला.
हा सल्ला मनावर घेत राकेश रोशन यांनी आपल्या चित्रपटांचं नाव K वरुन ठेवण्यास सुरुवात केली. यानंतर खरोखरच त्यांचा K अक्षराने सुरु होणारा 'खुदगर्ज' चित्रपट चांगलाच चालला.
तेव्हापासून राकेश रोशन K अक्षरावरुनच आपल्या चित्रपटांची नावं ठेवतात. 'करण अर्जुन', 'कहो न प्यार है', 'क्रिश', 'कोई मिल गया' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.