'स्वातंत्र्यवीर सावरकर' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रणदीप हुड्डाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

ज्यामध्ये त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन धक्कादायक आहे. फोटोमध्ये रणदीप खूपच बारीक दिसत आहे.

फोटो शेअर करत रणदीप हुड्डाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "काला पानी."

रणदीप हुडाचा हा फोटो 'स्वातंत्र्यवीर वीर सावरकर'च्या सीनच्या शूटिंगदरम्यान काढण्यात आला होता.

ज्यामध्ये तो काळ्या पाण्याची शिक्षा हा सीन जगत होता.

रणदीप हुडाचा झालेला बदल पाहून सोशल मीडिया यूजर्स त्याचं जोरदार कौतुक करत आहेत. एका युजर्सने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की, "तुम्हाला सहमती द्यावी लागेल भाऊ...वंदे मातरम." तर दुसऱ्या युजर्सने लिहीलंय, "काय माणूस आहे. तो प्रत्येक पात्रात आपला जीव ओवाळून टाकतो."

तर काहींनी त्याला पाहून, चिंता व्यक्त केली आहे. एका युजर्सने कमेंट करत म्हटलंय, "काय झालं भाऊ?" तर अजून एकाने लिहीलंय, "नाही सर, नाही." तर अजून एकाने लिहीलंय,"तुम्ही आजारी आहात का ?

VIEW ALL

Read Next Story