मेरा दिल ये पुकारे आजा, या भारतीय हिंदी गाण्यावर डान्स स्टेप्स करणारी पाकिस्तानी गर्ल आयशा पाकिस्तानातच नाही तर भारतातही प्रसिद्ध झाली. तिच्या स्टेप्सवर अनेकानी रिल्स बनवले. अगदी धकधक गर्ल माधुरी दीक्षितलाही तिच्या सारख्या स्टेप्स करण्याचा मोह आवरता आला नाही. यानंतर आयेशाने अनेक व्हिडिओ बनवले. पण त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.
शेंगदाने विकणारा भुबन कच्चा बादाम गाण्यामुळे देशभरात लोकप्रिय झाला. पण आज परिस्थिती अशी आहे की भुबन आपलंच गाणं गाऊ शकत नाही. कारण ते गाणं कॉपीराईटमध्ये अडकलं गेलं आहे. आता त्याची फारशी कमाईदेखील नाही.
आपल्या खास अंदाजात डोळा मारुन व्हायरल झालेली प्रिया प्रकाश वारियर नॅशनल क्रश बनली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अवघ्या 10 सेकंदाच्या त्या व्हिडिओने प्रियाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. व्हायरल झाल्यानंतर प्रियाला अनेक चित्रपट मिळाले, पण स्वत:ची खास ओळख ती बनवू शकली नाही.
लग्नाच्या कार्यक्रमात गोविंदाच्या एका गाण्यावर जबरदस्त डान्स करणारे संजीव श्रीवास्तव उर्फ डब्ब अंकल यांना लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्या डान्स स्टेप्सचं कौतुक झालं. पण ते लाईमलाइटपासून दूर आहेत.
बसपन का प्यार हे गाणं सोशल मिडियावर व्हायरल झालं आणि हे गाणं गाणारा छोटा सहदेव रातोरात स्टार झाला. प्रसिद्ध गायक बादशाहने देखील या गाण्यावर रिमिक्स केलं आणि यात सहदेवला संधी दिली. पण या गाण्यानंतर सहदेव लोकांच्या विस्मृतीत गेला.
2019 मध्ये रानू मंडल कोलकाताच्या एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं गाणं गात असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या आवाजाने सर्वांनीच तिचं कौतुक केलं. इतकंच काय तर हिमेश रेशमियांनी तिला एका चित्रपटात गाण्याची संधीही दिली. पण ही लोकप्रियता रानू मंडलला सांभाळता आली नाही.
सोशल मीडियाने अनेकांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं. काही जण रातोरात स्टार झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका छोट्याश्या व्हिडिओने काही जणं देशभरात लोकप्रिय झाले, पण यातले अनेक जण सध्या लाईमलाईटपासून दूर फेकले गेलेत.