बॉलिवूडमध्ये क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आहे. एमएस धोनी, मेरी कॉम, मिल्खा सिंगवर याआधीच बायोपिक बनले आहेत.

तुम्ही विचार केला आहे का? टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीवर बायोपिक बनली तर त्यात कोणता अभिनेता त्याची भूमिका साकारेल.

इंडियन क्रिकेटर दिनेश कार्तिकने याचं उत्तर दिलं आहे. Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत दिनेश कार्तिकने टीम इंडियातल्या काही खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचा सल्ला दिला.

विराट कोहलीवर बायोपिक बनला तर अभिनेता रणबीर कपूर या भूमिकेसाठी योग्य असल्याचं कार्तिकने म्हटलंय. विराटची प्लेईंग स्ट्राईल कॅप्चर करण्याची क्षमता रणबीरमध्ये असल्याचं त्याने म्हटलंय.

शिखर धवनच्या बायोपिकमध्ये दिनेश कार्तिकने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला पसंती दर्शवली आहे. अक्षय या भूमिकेत फिट असल्याचं कार्तिकने म्हटलंय.

हार्दिक पांड्याच्या बायोपिकसाटी रणवीर सिंह योग्य असल्याचं कार्तिकचं म्हणणं आहे. तर जसप्रीत बुमराहच्या रोलसाठी कार्तिक आर्यनला पसंती दिली आहे.

रोहित शर्माच्या कारकिर्दीवर बायोपिक झाला तर दाक्षिणात्या स्टार विजय सेतुपती बेस्ट असल्याचं कार्तिकने म्हटलंय. गमतीशर आणि गंभीर दोन्ही भूमिका तो साकारू शकतो.

VIEW ALL

Read Next Story