फिट आणि फाईन आपल्यापैकी प्रत्येकाला दिसायचं आहे. पण बेली फॅट वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे.
वजन वाढवणं जितकं सोपं आहे तितकंच ते कमी करणं कठीण वाटतं.
तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या या सकाळच्या सवयी देखील पोटावरील चरबीचे कारण असू शकतात.
नाश्ता वगळणं ही सर्वात मोठी चूक आहे. नाश्ता न केल्याने वजन वाढतं कारण जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जास्त खातो.
नाश्त्यात तेल, मसाले आणि तळलेले पदार्थ खाणेही योग्य नाही.
सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने चयापचय खराब होऊ शकतो त्यामुळे 9 तासांपेक्षा जास्त झोपू नये.