अभिनेता आर माधवनने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनायाची छाप उमटवली आहे. आर माधवनचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. चित्रपटाबरोबर आर माधवनने OTTवर अनेक मालिकांमधूनही काम केलं आहे.

आर माधवनच्या रॉकेट्री द नंबी इफेक्ट या चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुस्कार जाहीर झाला आहे. आता आर माधवनवर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आर माधवनची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही बातमी शेअर केली आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासाठी आर माधवनला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आर माधवनने अभिनय साकारला आहे. 'रेहना है तेरे दिल मे' या हिंदी चित्रपटाने आर माधवनला ओळख मिळाली. यानंतर 'तनू वेड्स मनू रिटर्न्स', 'थ्री इजियट्स', 'रंग दे बसंती' असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले

आर माधवनच्याआधी फिल्ममेकर शेखर कपूर या पदावर होते. 3 मार्च 2023 ला त्यांचा कार्यकाळ संपला. आता या पदावर आर माधवनची नियुक्ती करण्यात आली आहे.

FTII च्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर आर माधवनने मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत. आपण दिलेली योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन असं आर माधवनने म्हटलं आहे.

FTII संस्थेत अभिनयाचा कोर्स शिकवला जातो. ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील, डेविड धवन, शबाना आझमी, जया बच्चन अशा अनेक दिग्गज कलाकारांनी इथून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

VIEW ALL

Read Next Story