आमिर खानच्या करिअरमधील फ्लॉप चित्रपटांचा उल्लेख केला जातो, तेव्हा 'मेला' हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं.
धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आपल्याला हा चित्रपट करायचा नव्हता, पण आमिर खानने आपल्याला भावाच्या करिअरला हातभार लावायचं आहे असं सांगितलं होतं असा खुलासा त्यांनी केला आहे.
आपण जेव्हा पहिल्यांदा आमिर खानसह काम केलं, तेव्हा आपण हिंदी चित्रपटसृष्टीला पूर्णपणे समजू शकलो नव्हतो. पण मेला चित्रपटादरम्यान त्यांनी हैराण करणाऱ्या अनेक गोष्टी केल्या असं सांगितलं.
आमिर खानने आपल्याला चित्रपटात एक 'अश्लील' सीन करण्यास सांगितलं होतं. हा सीन त्याने हॉलिवूड चित्रपट 'डम्ब अँड डम्बर'मध्ये पाहिला होता असं त्यांनी सांगितलं.
धर्मेश म्हणाले, तुमचा विश्वास बसणार नाही पण चित्रपटात जॉनी लिव्हरसह एक युरिन थेरपी सीन आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी रडलो होतो.
पुढे ते म्हणाले की, कोण विश्वास ठेवेल की हा आमीर खानच्या चित्रपटातील सीन आहे. तेव्हा आमिरने मला इतकं बनावट होण्याची गरज नाही असं सांगितलं होतं.
या मुलाखतीत धर्मेश दर्शनने काजोलने मेला चित्रपटास नकार दिल्याचाही खुलासा केला. यामागील कारणही आमिर खान होता.
धर्मेश दर्शन यांच्या सांगण्यानुसार, आमिर खान एका सीनसाठी अनेक टेक घेतो असं तिने ऐकलं होतं. आणि तिला एका टेकमध्येच सीन पूर्ण करणं आवडत होतं. यामुळेच तिने आमिरसह काम करण्यास नकार दिला.