सुपर मॉडेल आणि फिटनेस फ्रिक मलायका अरोरा सिनेमांमध्ये अभिनय करत नाही पण तरीही तिचं राहणीमान एखाद्या टॉप क्लास अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने 23 ऑक्टोबरला शानदार पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला

Wikipedia च्या मते मलायका अरोराने यंदा आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी फॅन्सने तिला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या.

पण मलायका अरोराने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

वाढदिवशी मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मलायकने आपण 48 वर्षांची झाल्याचं म्हटलं आहे.

मलायकच्या पोस्टने तिच्या वयाबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मलायका आपलं खरं वय लपवत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.

एका युजरने कमेंट करत म्हटलंय गेल्या वर्षी मलायकने 49 वा वाढदिवस साजरा केला. मग या वर्षी 48 वा वाढदिवस का असेल.

एका युजरने म्हटलंय गुगलवर मलायका अरोराचं वय 50 वर्ष दाखवत आहे. तू स्वत:चं वय दोन वर्षांनी कमी काय सांगत आहेस

एक मात्र नक्की मलायकाचं वय 48 असो की 50, ती आपल्या फिटनेसने तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देते.

VIEW ALL

Read Next Story