बार्बी चित्रपटाची सध्या जगभरात धूम आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात बार्बी चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे

लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही हा चित्रपट चांगलाच पसंतीस पडला आहे.

या चित्रपटात बार्बीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मार्गो रॉबीने. तिच्या अभिनयाचीदेखील चांगलीच चर्चा आहे.

मार्गो रॉबी बार्बी चित्रपटाची केवळ अभिनेत्रीच नाही तर या चित्रपटाची ती निर्माताही आहे.

रिल लाईफमध्ये बार्बीचं लग्न झालेलं नाही. पण रिअल लाईफमध्ये ती विवाहित आहे. तिच्या पतीचं नाव टॉम एकर्ली असं आहे.

मार्गो आणि टॉमची पहिली भेट 2014 साली Suite francais या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झाली.

मार्गो आणि टॉमने काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. बार्बी चित्रपटाच्या यशात टॉमचाही मोठा वाटा आहे

पती टॉममुळेच अभिनय क्षेत्रात आल्याचं मार्गोने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मार्गोला आपल्या अभिनयावर विश्वास नव्हता.

पती टॉमने विश्वास दिला की तू चांगला अभिनय करु शकतेस, त्यानंतर विश्वासाने अभिनय क्षेत्रात उतल्याचं मार्गो सांगते

मार्गो आणि टॉमनेने 2020 मध्ये निर्मिती केलेल्या प्रॉमिसिंग यंग वुमन चित्रपटाने ऑस्कर अवॉर्ड जिंकला होता.

VIEW ALL

Read Next Story