विश्वचषक स्पर्धा

भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरवात होणार आहे.

बॉलिवूडवर परिणाम

पण विश्वचषकाच्या वेळापत्रकामुळे बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिग बजेट चित्रपट

ज्या वेळी सामने आहेत, त्याच वेळी बॉलिवूडमधल्या दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अनेक चित्रपट बिग बजेट आहेत.

'द ग्रेट इंडियन रेस्क्यू'

विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबराला खेळवला जाणार आहे. याच तारखेला अक्षय कुमारचा 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' हा चित्रपटा प्रदर्शित होणार आहे.

टायगरचा गणपथ

20 ऑक्टोबरला टायगर श्रॉफचा गणपथ आणि यारियां हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील. या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे.

सलमानचा टायगर-3

10 नोव्हेंबरला सलमान खान याचा टायगर3 प्रदर्शित होणार आहे. तर वॅक्सीन वॉर, योद्धा हे चित्रपटही याचदरम्यान प्रदर्शित होणार आहेत.

भारत वि. ऑस्ट्रेलिया

याशिवाय प्रत्येक विकेंडला टीम इंडियाचा सामना आहे. 8 ऑक्टोबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळवला जाणार आहे.

हाय व्होल्टेज सामना

विश्वचषकातील हायव्होल्टेज सामना असलेला भारत आणि पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला होईल. या दिवशी रविवार आहे.

42 दिवस सामने

प्रत्येक सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल आणि रात्री 11 वाजता संपेल. म्हणजे संपूर्ण दिवस लोकं टीव्हीसमोर किंवा स्टेडिअममध्ये असतील

थिएटरवर परिणाम

परिणामी थिएटरमध्ये चित्रपट पाहिला खूपच कमी लोकं जाण्याची शक्यता आहे. क्रिकेट विश्वचषकाची क्रेझ पाहता या चित्रपटांवर परिणाम नक्कीच जाणवेल

VIEW ALL

Read Next Story