बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर राघव जुआलला लॉटरी लागली आहे.
राघवकडे आता तीन चित्रपट आहेत. यात गुनीत मोंगाचा 'युद्ध', करण जौहर प्रोडक्शनचा आणि आखमी एक चित्रपट आहे.
पण हे यश एका रात्रीत मिळालं नाही. यामागे राघवचा खडतर प्रवास आहे. बॅकग्राऊंड डान्सर ते कोट्यवीश असा हा प्रवास आहे
सलमान खानच्या चित्रपटाने शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री केलीय. या चित्रपटात राघवने भूमिका साकारली आहे.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या यशानंतर राघवच्या मानधनातही वाढ झाली आहे.
पण इतक्यावरच आपल्याला थांबायचं नाहीए, आणखी पुढे जायचं असल्याचं राघवने म्हटलं आहे.
2011 मध्ये राघव रिआलिटी शो 'चाक धूम धमू' च्या ऑडिशनसाठी मायानगर मुंबईत आला होता.
ज्या ठिकाणी शुटिंग व्हायची, त्याच ठिकाणी तो राहायचा. एका वडापावर पूर्ण दिवस काम करायचा. एका खोलीत 25 जण राहात होते.
आमच्या फ्रिज तर सोडा साधं कपाटही नव्हतं. पण आम्हाला कसलीच तक्रार नव्हती. ते अडचणीचे दिवसही आम्ही एंजॉय केले असं राघव सांगतो.
आज राघव जुआल हा टीव्हीवरचा एक प्रसिद्ध चेहरा बनलाय. एका रिअॅलिटी शोचं अँकरिग त्याने केलं असून आपल्या दिलखुलास स्वभावाने त्याने सर्वांची मनं जिंकलीत.