प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणं हे प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं. मंगळवारी म्हणजे 17 ऑक्टोबर 2023 ला दिल्लीत 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला,
दिल्लीत पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात सर्व विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. पण तुम्हाला माहित आहे का पुरस्कार विजेत्यांना किती पैसे मिळतात
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमध्ये सुवर्ण कमल आणि रजत कमल असे दोन विभाग असतात. सुवर्ण कमल विजेत्यांना जास्त प्राईज मनी दिला जातो.
सुवर्ण कमल विजेत्यांमध्ये बेस्ट फिचर फिल्मसाठी 2.5 लाख रुपये दिले जातात. तर इंदिरा गांधी पुरस्कार विजेत्याला 1.25 लाख रुपये मिळतात.
बेस्ट चिल्ड्रन फिल्म विजेत्याला 1.5 लाख रुपये आणि मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याला 10 लाख रुपये आणि मानचिन्ह दिलं जातं.
यदा हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
रजत कमल विजेत्यांमध्ये नगरगिस दत्त पुरस्कार विजेत्याला 1.5 लाख रुपये प्राईज मनी दिला जातो. तर सामाजिक चित्रपटांसाठीही 1.5 रुपये दिले जातात.
रजत कमल गटात बेस्ट फिल्म विजेत्याला 1 लाख रुपये, बेस्ट अॅक्टरला 50 हजार, बेस्ट अॅक्ट्रेसला 50 हजार रुपये दिले जातात.