Ashok Saraf : 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचं खरं नाव माहितीये का?

अशोक सराफ

मराठी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर पोहोचवण्याचं काम अभिनेते अशोक सराफ यांनी केलंय. गेल्या 4 दशकात तमाम रसिकांच्या हृदयात एक वेगळं स्थान अशोक मामांनी निर्माण केलंय.

'महाराष्ट्र भूषण

अशातच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली.

खरं नाव काय?

मात्र, तुम्हाला तुमचा लाडका अभिनेता अशोक सराफ यांचं खरं नाव माहितीये का?

निवेदिता सराफ

अशोक सराफ यांचं खरं नाव अशोक कुमार आहे, असा खुलासा अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत केला होता.

अशोक कुमार

अशोकच्या मोठ्या बहिणीला अभिनेते अशोक कुमार खूप आवडायचे. त्यामुळे त्यांनी अशोक कुमार नाव ठेवलं होतं, असं निवेदता सांगतात.

सोशल मीडिया अकाऊंट

तुम्हाला माहितीये का? अशोक सराफ एवढे मोठे कलाकार आहेत पण त्यांचं सोशल मीडियावर अकाऊंट देखील नाही.

सोशल मीडिया

मला सोशल मीडिया अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी सोशल मीडियावर नाही, असं अशोक सराफ म्हणतात.

...तरच फोन वापरतो

मी फेसबुक, व्हॉट्सअॅप वापर नाही. मी फक्त कोणाचा फोन आला तरच फोन वापरतो, असंही अशोक मामा म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story