'या' चित्रपटात अमिताभ पहिल्या अर्ध्या तासात मेलेले दाखवले; तरी चित्रपट ठरला सुपरहीट!

Swapnil Ghangale
Jun 17,2024

बॉलिवूड म्हणजे बिग बी

बॉलिवूड म्हणजेच बिग बी असं मागील पाच दशकांहून अधिक काळापासून जणू काही समीकरणच झाल्याप्रमाणे अमिताभ बच्चन मनोरंजन सृष्टीवर राज्य करत आङेत.

अनेकांना चित्रपट अगदी तोंडपाठ

अमिताभ यांनी असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचे काही दशकांपूर्वीचे चित्रपट आजही अनेकांना अगदी तोंडपाठ आहेत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

करिअरच्या सर्वोच्च स्थानी

1970 ते 1980 च्या दशकामध्ये अमिताभ त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी होते. या काळात त्यांनी काही सुपरहीट चित्रपट दिले.

दमदार कामगिरी

असाच एक चित्रपट 1978 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासातच अमिताभ यांनी साकारलेली व्यक्तीरेखा मरण पावते असं दाखवण्यात आलेलं. मात्र त्यानंतर या चित्रपटाने दमदार कामगिरी केलेली.

कोणता आहे हा चित्रपट?

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे 'डॉन'! हा चित्रपट 160 मिनिटांचा होता.

डॉन पहिल्या 35 मिनिटांमध्येच मरतो

मात्र या चित्रपटात अमिताभ यांनी साकारलेला डॉन पहिल्या 35 मिनिटांमध्येच मरतो, असं कथानक आहे.

डबल रोल

अर्थात अमिताभ यांनी या चित्रपटात डबल रोल केल्याने डॉनसारखाच दिसणारा विजयनंतर कथानकाचं मुख्य पात्र होतं.

भूमिका अजरामर झाल्या

1978 मधील सर्वात यशस्वी चित्रपटाबद्दल बोलताना आजही 'डॉन'चं नाव आवर्जून घेतलं जातं. अमिताभ यांनी साकारलेल्या दोन्ही भूमिका अजरामर झाल्या.

2006 मध्ये रिमेक

'डॉन' चित्रपटाचा रिमेक 2006 साली तयार करण्यात आला होता.

सिक्वेलही आला

'डॉन' चित्रपटात शाहरुख खानने डॉनची भूमिका साकारलेली. याचा सिक्वेल 2011 ला आला.

'डॉन 3'मध्ये हा सुपरस्टार मुख्य भूमिकेत

आता 'डॉन 3' ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहे.

VIEW ALL

Read Next Story