दीपिकाने दिला मुलीला जन्म, रणवीर काय नाव ठेवणार परीचं? काही वर्षापूर्वी ठरवलं, पण आता...

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत.

दीपिकाने रविवारी (8 सप्टेंबर 2024) रोजी मुलीला जन्म दिला आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे जोडपे आपल्या मुलीचे नाव काय ठेवणार हेही चाहत्यांना जाणून घ्यायचे आहेत.

काही वर्षांपूर्वी एका शोमध्ये रणवीरने एक ना उघड केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, मी नावांची यादी बनवत आहे.

तुम्हाला काही अडचण नसेल तर मी तुमचे नाव शौर्यवीर सिंह घेऊ शकतो का? त्यावेळी रणवीरने आपल्या होणाऱ्या बाळासाठी या नावाचा विचार केला होता.

मात्र, आता रणवीर आपल्या बाळाला हे नाव देऊ शकणार नाही. कारण शौर्यवीर हे मुलाचे नाव आहे आणि दीपिकाला मुलगी झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story