जाती-धर्माच्या भिंती ओलांडत 'या' कलाकारांनी बांधली लग्नगाठ

अंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह हल्ली समाजात सर्रास पार पाडतात. जाती धर्माच्या भिंती बाजूला सारत अनेक जोडपे आपले साथीदार निवडतात. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकांरानीही Intercast Marriage केले आहेत.

टीव्ही कलाकारांनीही Intercast आणि Interreligious Marriage केले आहेत. आज हे सुखाचा संसार करत आहे. या जोड्यांवर एक नजर

देबिना आणि गुरमीत

टीव्हीवरील राम-सीता म्हणून आजही देबिना बॅनर्जी आणि गुरमीत सिंह यांना ओळखले जाते. देबिना ही बंगाली आहे तर गुरमीत बिहारचा. या दोघांनीही 2006मध्ये सिक्रेट मॅरेज केले होते. तर 2011मध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत जाहीर केले होते.

आश्का गोर्डिया आणि ब्रँट गोब्ले

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आश्काने अमेरिकेतील ब्रँट गोब्लेसोबत लग्नगाठ बांधली. हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने त्यांनी 2017मध्ये लग्न केले होते.

करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर हे आज बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात. पंजाबी आणि बंगाली संस्कृतीनुसार त्यांचे लग्न झाले होते.

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे दोघेही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे. दीपिका ही हिंदू आहे तर शोएब मुस्लिम. दोघांनीही 22 फेब्रुवारी 2017 रोजी लग्नगाठ बांधली.

देवोलीना भट्टाचार्ज आणि शहनवाज शेख

छोट्या पडद्यावर गोपी बहू म्हणून लोकप्रियता मिळवलेली देवोलीना भट्टाचार्ज हिने देखील शहनवाज शेख याच्यासोबत लग्न केले आहे. 2022मध्ये तिने जिम ट्रेनर असलेल्या शहनवाजसोबत लग्न केले.

VIEW ALL

Read Next Story