Asia Cup 2023 : भारत-पाक सामन्यात 'या' खेळाडूंचा एकमेकांशी 36 चा आकडा
आशिया चषकादरम्यान 2010 मध्ये गंभीर आणि अकमल हे दोन खेळाडूही एकमेकांशी भिडले होते. अकमलनं त्यावेळी गंभीरची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न केला होता.
ड्रींक्स ब्रेकदरम्यानच गंभीरनं अकमलवर शाब्दिक वार केला, ज्यानंतर पंचांनी मध्ये येत त्या दोन्ही खेळाडूंना शांत केलं.
इथं आशिया चषकादरम्यान अख्तरनं लागोपाठ दोन बाऊन्सर टाकले. त्याचवेळी भज्जी आणि अख्तरमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
2007 मध्ये एकदिवसीय मालिकेदरम्यान तिसऱ्या सामन्यात शाहीद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. गंभीरनं 20 व्या षटकात आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याला नजर दिली होती.
पुढच्या चेंडूवर गंभीरनं एक धाव काढली. पण, त्यादरम्यानच आफ्रिदी त्याच्या वाटेत आला. दोघांमध्ये काही शब्दांची देवाणघेवाण झाली आणि हे प्रकरण अखेर पंचांनी शांत केलं.
1996 मधील विश्वचषकाचा अंतिम सामना आठवतोय? इथं पाकच्या खेळाडूला अर्धशतकामुळं चांगला सूर गवसला होता. त्यानं आपण ऑफसाईडला चेंडू भिरकावू असा इशारा व्यंकटेश प्रसादला केला.
पुढच्याच चेंडूवर व्यंकटेश प्रसादनं पुढच्याच चेंडूवर सोहेलला Clean Bold केलं होतं. हा क्षण क्रिकेटप्रेमींना कायमच लक्षात राहिला.
यावेळी मियाँदाद आणि मोरे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. मियाँदाद यांनी यावेळी पंचांकडे तक्रारही केली होती.
मोरेकडे पाहून नंतर मियादादनं त्याची नक्कल केली होती. बॅट दोन्ही हातांमध्ये पकडून मियाँदादनं विटित्र पद्धतीनं जोरजोरात उड्या मारल्या होत्या.