पती Sam Asghari च्या'त्या' धमकीनंतर...
वादग्रस्त अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स कायम चर्चेत असते. गेल्या वर्षी जून महिन्यात तिने तिसरं लग्न केलं होतं. पण ते लग्न तुटल्याची बातमी समोर आली आहे.
ब्रिटनीचा पती सॅम अशगरीने तिच्यावर बेवफाई आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
टीएमजीच्या रिपोर्टनुसार, दोघांमधील मतभेद इतकं वाढलंय की नातं तोडण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असं सॅमने स्पष्ट
2016 मध्ये ब्रिटनीने आयोजित केलेल्या स्लंबर पार्टीमध्ये ते एकत्र दिसले तेव्हा दोघांमधील नातं समोर आलं होतं.
या जोडप्याला शेवटचे काबो, मेक्सिकोच्या सहलीवर एकत्र पाहिले गेले होते, त्या दरम्यान ते दोघेही आनंदी दिसत नव्हते.
TMZ ने अहवाल दिला की सॅमने ब्रिटनीकडे मोठ्या रकमेची मागणी केली आहे. एवढंच नाही तर वकिलाच्या फीची मागणी करण्यात आली आहे. तरी ब्रिटनीच्या टीमने हे ब्लॅकमेलिंग असून असं कधीही होणार नाही असं म्हटलंय.
जर ब्रिटनीने पैसे दिले नाही तर तो तिचे आक्षपार्ह व्हिडीओ लिक करेल अशी धमकी नवरा सॅमने तिला दिली आहे.
ब्रिटनीचं वैयक्तिक आयुष्य विचित्र घटन्यांनी चर्चेत राहिलं. वडिलांनी तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी बॉडीगार्ड ठेवला होता.
ब्रिटनचं पहिलं लग्न 55 तासांमध्ये तुटलं होतं. तर दुसरं लग्न हे फक्त 3 वर्षे टिकलं.