अक्षय कुमार आणि रवीना टंडन

बॉलिवुडच्या खिलाडी अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले.रवीना टंडनसोबत त्याचं अफेअर कायम चर्चेचा विषय ठरलं आहे.

90 च्या दशकात दोघांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारली.आता तब्बल 19 वर्षानंतर ही जोडी रुपेरी पडद्यावर 'वेलकम-3' मध्ये एकत्र दिसणार आहे.

शाहिद कपूर आणि करीना कपूर खान

बेबो आणि शाहिदने उडता पंजाबमध्ये एकत्र काम केले, ज्याने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली. या सिनेमाने जगभरात 97 कोटी रुपयांची कमाई केली.

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर

'ये जवानी है दिवानी' या सुपरहिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 316 कोटींची कमाई केली.हा चित्रपट प्रचंड गाजला तसेच टीकाकारांच्या पसंतीस देखील उतरला.

अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग

'दिल धडकने दो' मधून हे दोघे एकत्र आले. बॉक्स ऑफिसमध्ये या चित्रपटाने 150 कोटी रुपये कमाई केली.

सलमान खान आणि कतरिना कैफ

'टायगर जिंदा है' मध्ये चाहत्यांना सलमान खान आणि कतरिना कैफची केमिस्ट्री प्रचंड आवडली. जागतिक स्तरावर या सिनेमाने 434.82 रुपये कमावले.

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा

'कपूर अँड सन्स' चित्रपटादरम्यान हे दोघेही त्यांच्या नात्यातील खडतर टप्प्यातून जात होते. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 101.79 कोटी रुपयांची कमाई केली.

शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा

बॉलिवूडचा हॅंडसम हंक शाहिद कपूर आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा 'कमीने' मध्ये एकत्र झळकले होते. या चित्रपटाने जगभरात 68.02 कोटींची कमाई केली.

सोनम कपूर आणि रणबीर कपूर

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि सोनम कपूर हे दोघे 'संजू' चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले.या चित्रपटाने 439.14 कोटींची कमाई केली.

रणबीर आणि कतरिना कैफ

'जग्गा जासूस' या चित्रपटाच्या माध्यमातून हे लव्ह बर्ड्स एकत्र आले.सतत होणाऱ्या 'तू तू मैं मैं' मुळे हे दोघे दुरावल्याचे समजते. या सिनेमाने 75.22 कोटी रुपये कमाई केली.

VIEW ALL

Read Next Story