भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सर्वांचाच मूड खराब झाला. पण क्रिकेट सामन्यांमधे पाऊस येण्याची ही पहिली वेळ नाहीये. बऱ्याचदा मॅच दरम्यान पाऊस आल्याने मैदान ओले होते.

Sep 11,2023


मैदान सुकवण्यासाठी खूपदा ग्राऊंडस्टाफ अशा काही गोष्टी वापरतात की ज्या बघून थक्क व्हायला होते. चला पाहूया असेच काही मैदान सुकावण्यासाठी केलेले विचित्र उपाय.

पंखे

आता चालू असलेल्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यावेळी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममधील ग्राऊंडस्टाफने मैदान सुकवण्यासाठी पंख्यांचा वापर केला.

हेयर ड्रायर

2020 मध्ये गुवाहाटी येथे भारत-श्रीलंका सामन्यात पाऊस आला होता. त्यावेळी तिथल्या ग्राऊंडस्टाफने मैदान सुकवण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर केला होता.

इस्त्री

याच भारत-श्रीलंका मॅच दरम्यान इस्त्री आणि वैक्युम क्लीनरचाही मैदान सुकवण्यासाठी वापर करण्यात आला होता.

हेलिकॉप्टर

2018 साली पाकिस्तान सुपर लीग दरम्यान लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम मध्ये पाऊस पडला होता. त्यावेळी पावसाचे पाणी सुकावण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर आणले होते.

स्पंज

IPL 2023 च्या फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रचंड पाऊस आला. मैदानावरील ते पावसाचे पाणी सुकवण्यासाठी स्पंजचा वापर करण्यात आला होता.

VIEW ALL

Read Next Story