शाहरुख खान

अभिनेता शाहरुख खान गेल्या कैक वर्षांपासून सुट्ट्यांसाठी त्याच्या अलिबाग येथील फार्महाऊसवर जातो.

अलिबाग आऊटिंग

बर्थडे पार्टी म्हणू नका किंवा मग आऊटिंग, शाहरुख, त्याचं कुटुंब आणि त्याचा मित्रपरिवार या ठिकाणाला पसंती देताना दिसतो.

विरुष्का

अलिबागच्या प्रेमात असणाऱ्या सेलिब्रिटींच्या नावांमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्याही नावाचा समावेश झाला आहे.

फार्महाऊस

अनुष्काच्या कुटुंबासमवेत ही मंडळी त्यांच्या या फार्महाऊसवर अनेकदा जाताना दिसली आहेत.

दीपवीर

किंग खानप्रमाणंच काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीसुद्धा अलिबागमध्ये नवं घर घेतलं.

वास्तूपूजा

सोशल मीडियावर या वास्तूतील पुजेचे फोटो त्यांनी शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली.

अनिता श्रॉफ अदजानिया

सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदजानिया आणि होमी अदजानिया यांनीही अलिबागच्या समुद्र किनारी घर घेतलं आहे.

राहुल खन्ना

अभिनेता राहुल खन्ना लहान असल्यापासूनच अलिबागला भेट देत आला आहे. इतकंच नव्हे तर इथं त्याचं घरही आहे.

रवी शास्त्री

क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासाठी अलिबाग म्हणजे स्वर्ग. इथं ते बराच वेळ व्यतीत करतात. असं म्हणतात की त्यांचंही इथं हॉलिडे होम आहे.

गौतम सिंहानिया

अलिबागमध्ये घर असणाऱ्यांमध्ये भारतीय व्यावसायिक गौतम सिंहानिया यांचंही नाव येतं.

VIEW ALL

Read Next Story