हृदय, किडनीचं आरोग्य अन्... केळ्याचे 'हे' फायदे वाचून नक्कीच वाटेल आश्चर्य

अगदी 5 रुपयांना मिळणारं हे फळं लाखो रुपयांचा खर्च वाचवू शकतं, कसं ते पाहा...

एनर्जी हाऊस फ्रूट

केळं हे सर्वात स्वस्त फळ असण्याबरोबरच फार पौष्टीक फळंही आहे. केळ्याला एनर्जी हाऊस फ्रूट असंही म्हणतात.

अनेक पोषक तत्व

केळ्यामध्ये प्रोटीन, कार्ब, फायबरसहीत अनेक पोषक तत्व असतात.

शुगर संतुलित ठेवण्यासाठी

ब्लड शुगरचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी केळं फायद्याचं असतं.

पचनसंस्थेला फायदा

केळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. विशेष म्हणजे हे डाएट फायबर असतं. यामुळे पचनसंस्थेला फायदा होतो.

पचन सुधारण्यास मदत

कच्च्या केळ्यांमध्ये रेसिस्टंट स्टार्च असतं. हा एक प्रोबायोटिक घटक असतो. म्हणूनच केळ्याचं सेवन केल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

बराच काळ भूक लागत नाही

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही केळ्याचा फार फायदा होतो. केळ खाल्ल्यानंतर बराच काळ भूक लागत नाही.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा

केळ्यातील मिनरल पोटॅशिअम हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं. खास करुन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं

पोटॅशिअम असलेले पदार्थ खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांमध्ये होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो, असं अनेक संशोधनांमधून सिद्ध झालं आहे. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही केळ फायद्याचं असतं.

किडनीसाठी फायद्याचं

केळ्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्याबरोबरच किडनीच्या आरोग्यही सुदृढ राहतं. किडनी सुदृढ ठेवण्यासाठी केळांचं सेवन फायद्याचं ठरतं.

किडनीच्या प्रकृतीसाठी फायदा

हृदयाप्रमाणेच किडनीच्या प्रकृतीसाठीही पोटॅशिअम फायद्याचं असतं. केळ हे अॅण्टी- ऑक्सिटंचंही काम करतं.

VIEW ALL

Read Next Story