मुर्ती लहान पण किर्ती महान; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींची उंची तुम्हाला माहितीये?

बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अशा काही अभिनेत्री ज्यांची उंची कमी आहे, मात्र त्यांनी बॉलिवूडमध्ये घवघवीत यश मिळवलं. जाणून घेऊयात उंचीने कमी पण अभिनयात दमदार अशा बॉलिवूड अभिनेत्रींविषयी...

श्रध्दा कपूर

श्रध्दा कपूरनं फार कमी वेळात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रध्दाची उंची अंदाजे 5 फुट 3 इंच आहे.

आलिया भट्ट

करण जोहरच्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' मधून पदार्पण करून सगळ्यांच्या मनात छाप सोडणाऱ्या आलिया भट्टची उंची 5 फुट 4 इंच आहे.

विद्या बालन

1995 मध्ये सिटकॉम 'हम पांच' यामधून विद्या बालननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेल्या या अभिनेत्रीची उंची 5 फुट 3 इंच आहे.

माधुरी दीक्षित

'धकधक गर्ल' म्हणून ओळख असणाऱ्या माधुरी दीक्षितची उंची 5 फुट 4 इंच आहे.

राणी मुखर्जी

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी राणी मुखर्जीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तर राणीची उंची अंदाजे 5 फूट 2 इंच असल्याचं म्हटलं जातं.

जया बच्चन

जया बच्चन या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. अभिनेत्री जया बच्चन यांची उंची 5 फूट २ इंच आहे.

काजोल

काजोल ही टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. तर काजोलची उंची साधारण 5 फुट 3 इंच असल्याचं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story